'मला वाटत नाही की...', Anil Kapoor यांनी लेकीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Anil Kapoor यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत धाकट्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी रियाला वाढदिवच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिया ही एक निर्माती आहे. 

Updated: Mar 5, 2023, 10:33 AM IST
'मला वाटत नाही की...', Anil Kapoor यांनी लेकीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा title=

Anil Kapoor Post For Rhea Kapoor On Her Birthday : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लाडकी आणि धाकटी लेक रिया कपूर (Rhea Kapoor) ही नेहमीच चर्चेत असते. मात्र, आज तिचे चर्चेत असण्याचे कारण खास आहे. ते म्हणजे आज रियाचा वाढदिवस आहे. आज रिया तिचा 36 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. रियाचे फोटो आणि व्हिडीओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रियाच्या वाढदिवसानिमित्तानं तिचे वडील अनिल कपूर यांनी तिच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (Rhea Kapoor Birthday Special)

अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा आणि लेक रिया कपूरचा एक फोटो शेअर केला आहे, तर त्यासोबत त्यांनी अनिल कपूर यांनी रियाच्या एका प्रोजेक्ट संबंधीत एक फोटो शेअर केला आहे. अनिल कपूर यांनी सगळ्यात पहिले जो फोटो शेअर केला आहे तो तिच्या लहानपणीचा आहे. या फोटोत रियानं पांढऱ्या रंगाचा एक फ्रॉक परिधान केला आहे. तर अनिल कपूर यांनी देखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर दुसऱ्या फोटोत रिया ही बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेननसोबत दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे दोन्ही फोटो शेअर करत अनिल कपूर म्हणाले, "तुझी उडण्याची वेळ आली आहे... तू स्वतंत्र आहेस, तू स्वत: आता निर्णय घेतेस... मला वाटत नाही की आता तुला माझ्या मदतीची गरज आहे. कारण आता तू तुझ्या क्रू, तुझी टीम आणि तुमच्या घराची काळजी घेण्यासाठी तयार आहेस.... मला माहित आहे की तू नक्कीच यशस्वी होशील! तुला खूप खूप शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

हेही वाचा : Video : आता बेडरूममध्ये घुसता का? 'या' व्यक्तीवर भडकला Saif Ali Khan

दरम्यान, रिया कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर लवकरच करीनासोबत रिया पुन्हा एकदा काम करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी ते 'वीरे दी वेडिंग 2' या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. या चित्रपटात चार मुलींची कहानी दाखवण्यात आली आहे. रियानं 2010 साली राजश्री ओझा यांच्यासोबत आयशा या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिची बहिण सोनम कपूरनं मुख्य भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात सोनमसोबत अभय देओलनं भूमिका साकारली होती. त्यानंतर 2014 साली रियानं खूबसूरत चित्रपटाची निर्मिती केली.