अंकिताच्या बॉयफ्रेंडने साजरा केला वाढदिवस; सुशांतच्या बहिणीची अशी प्रतिक्रिया

वाढदिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Dec 20, 2020, 11:40 AM IST
अंकिताच्या बॉयफ्रेंडने साजरा केला वाढदिवस; सुशांतच्या बहिणीची अशी प्रतिक्रिया

मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अंकिताचा बॉयफ्रेंड विक्की जैन (Vicky Jain) ने खूप आनंदाने साजरा केला. या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिता लोखंडेच्या या फोटोजवर सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने देखील कमेंट केली आहे. 

या वाढदिवसाचा व्हिडिओ अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी अंकिता केक, फूल, फुगे आणि म्युझिक यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने या खास क्षणाला गोल्डन शाइनिंग आऊटफिट घातलं होतं. ज्यामध्ये अंकिता अतिशय सुंदर दिसत होती. या व्हिडिओत अंकिता डबल लेअरवाला केक कापताना दिसत आहे. यावेळी अंकिताचे मित्रपरिवार देखील दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता हे सेलिब्रेशनचे फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'शुभेच्छा आणि स्वप्न.' या कमेंटमध्ये अंकिताने एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅप्पी बर्थ डे ब्युटीफूल'.