Ankita Lokhande च्या लग्नाची तारीख ठरली; डिसेंबर महिन्यात घेणार सप्तपदी

सुशात सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विकी जैनसोबत अंकिताचं जुळलं  

Updated: Nov 1, 2021, 01:21 PM IST
Ankita Lokhande च्या लग्नाची तारीख ठरली; डिसेंबर महिन्यात घेणार सप्तपदी title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या खासजी आयुष्यामुळे चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता देखील तिच्या आयुष्यात पुढे निघाली. सुशांतनंतर अंकिताच्या जीवनात उद्योगपती विकी जैनची एन्ट्री झाली. अंकिता सोशल मीडियावर विकीसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. एवढंच नाही तर दोघे एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात देखील जातात. दोघेही एकमेकांच्या कुटुंबाला फार जवळून ओळखतात. 

गेले अनेक वर्ष अंकिता आणि विकी एकमेकांना डेट करत आहेत. चाहत्यांना देखील त्यांची जोडी फार आवडते. अंकिता-विकीच्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर आता दोघे लग्न कधी करणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून सतत विचारला जात होता. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. अंकिता आणि विकी लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्टनुसार लॉन्ग रिलेशनशिपनंतर दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचं  सांगितलं जात आहे. ई-टाईम्सनुसार अंकिता आणि विकी डिसेंबर महिन्यात सप्तपदी घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघे 12, 13 आणि 14 लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नात फक्त त्यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.