Anushka Sharma आई झाल्यानंतर दिसली बोल्डलूकमध्ये

आई झाल्यानंतर Anushka Sharmaचा पहिल्यांदा बोल्डलूक पाहाताचं विराट झाला 'क्लिन बोल्ड'  

Updated: May 27, 2022, 03:00 PM IST
Anushka Sharma आई झाल्यानंतर  दिसली बोल्डलूकमध्ये  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतर पुन्हा तिच्या जुन्या फॉर्ममध्ये आली आहे. तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फोटो बघून स्पष्ट होत आहे की आता ती पूर्वीसारखी स्लिम झाली आहे.

अनुष्का शर्माच्या या फोटोंवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेक कमेंट करत आहेत. चाहते अनुष्काच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे कौतुक करत आहेत. याशिवाय यूजर्सने हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

करण जोहरच्या पार्टीत अनुष्का शर्माने जो ड्रेस घातला होता, त्या ड्रेसमध्ये तिने धमाकेदार फोटोशूटही केले आहे. हे फोटोशूट अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

चित्रपट जगतापासून दूर
अनुष्का शर्मा शेवटची 'झिरो' चित्रपटात दिसली होती. यामध्ये त्याने शाहरुख खानसोबत काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफनेही काम केले होते. अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे.