अनुष्कासोबत सावलीसारखी विराट नाही तर असते ही व्यक्ती

विराट नाही तर अनुष्कासोबत कोण आहे ती व्यक्ती?

Updated: Jun 30, 2021, 11:54 AM IST
 अनुष्कासोबत सावलीसारखी विराट नाही तर असते ही व्यक्ती

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती कायम ऍक्टिव्ह असते. शिवाय तिच्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगत असतातं. मध्यंतरी अनुष्का चर्चेत आली ती म्हणजे वामिकाच्या जन्मानंतर. फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलीचा एकत्र सांभाळ करतता. पण आता एका वेगळ्या कारणासाठी अनुष्का चर्चेत आली आहे. सध्या अनुष्काच्या बॉडीगर्डची चर्चा रंगत आहे.  अनुष्कासोबत सावलीप्रमाणे कायम असणाऱ्या बॉडीगार्डचं नाव सोनू आहे. 

Bodyguard Sonu Prakash Singh

सोनू हा अनुष्काचा फक्त बॉडीगार्ड नाही तर कुटुंबातील सदस्य आहे. अनुष्का आणि विराटच्या कुटुंबातील या सदस्याचं नाव प्रकाश सिंह (Prakash Singh)  असं आहे. विराट आणि अनुष्का बॉडीगार्ड सोनूचा वाढदिवस देखील मोठ्या थाटात साजरा करतात.  सोनू अनुष्कासोबत सगळया ठिकाणी असतो. 

Bodyguard Sonu Salary

जेव्हा अभिनेता शाहरूख खान स्टारर 'झीरो' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा देखील सोनू अनुष्कासोबतचं होता. तेव्हा अनुष्काने सोनूसाठी एक सरप्राइज पार्टी ठेवली हेती. अनुष्काचं विराटसोबत लग्न झाल्यानंतर सोनू खांद्यावर अनुष्काच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. फक्त अनुष्काचं नाही तर सोनू विराटला देखील सिक्योरिटी देतो.