धक्कादायक! मंदिरा बेदीच्या पतीचं निधन

कुटुंबाचा विरोध पत्करून केलं होतं लग्न 

Updated: Jun 30, 2021, 10:42 AM IST
 धक्कादायक!  मंदिरा बेदीच्या पतीचं निधन

मुंबई : मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं आज सकाळी निधन झालं आहे. कुटुंबातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. (Filmmaker Raj Kaushal, Mandira Bedi Husband, Passes Away After Suffering Heart Attack) तसेच आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है'

 या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. राज कौशलच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. 

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशन द्यायला गेली होती. राज मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम पाहत होते. इथूनच दोघांच्या प्रेमाची सुरूवात झाली. मंदिरा बेदीने 14 फेब्रुवारी 1999 मध्ये राज कौशल यांच्याशी लग्न केलं. 

कुटुंबाचा होता लग्नाला विरोध 

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं. मंदिराच्या पालकांना तिचं लग्न एका दिग्दर्शकाशी करायचं होतं. मात्र मंदिराच्या प्रेमापुढेच काहीच चाललं नाही.