Anushka Sharma : आम्ही पाहिलेल्या सुंदर मुलींपैकी तू एक नाहीस... असं तुम्हाला जर कोणी म्हटलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? असं आपल्याला कोणी सरळ शब्दात सांगत नाही पण कधी ना कधी कोणी तरी हे कळत न कळत बोलून जातं आणि याची आपल्यावर एक वेगळीच छाप राहते... असाच प्रकार काहीसा बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. (Anushka Sharma) अनुष्का शर्मा ही भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी असली तरी देखील ती त्याच्यावर अवलंबून नसून ती देखील तिच्या करिअरमध्ये पीकवर आहे. (Virat Kohli's Wife) बऱ्याच वेळा अनुष्काला तर विराटच्या वाईट खेळीसाठी ट्रोल केलं जातं. मग अनुष्काच्या फ्लॉप चित्रपटासाठी कधी कोणी विराटला जबाबदार ठरवलं का? प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्यात स्वत: चं स्ट्रगल करत असतो. आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्तानं आपण अनुष्काची Struggle Story जाणून घेणार आहोत. (Anushka Sharma's Struggle Story)
एका आर्मी कुटुंबातून असताना अनुष्कानं कसं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. इतकंच काय तर रिजेक्शनवर रिजेक्शन ते 'आम्ही पाहिलेल्या सुंदर मुलींपैकी तू एक नाहीस' हे वक्तव्य... आणि मातृत्वची जाणीव... अनुष्का विषयी अशा अनेक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
अनुष्काचा जन्म हा एका आर्मी कुटुंबात झाला असून तिच्याकडे कोणत्याही प्रकारचं फिल्मी बॅकग्राऊंड नव्हतं. असं असताना चित्रपटसृष्टीत येणं अनुष्कासाठी सोपं नव्हतं. अनुष्कानं एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. अनुष्काला मॉडेलिंग किंवा पत्रकारीता क्षेत्रात तिचे करिअर करायचे होते. अभिनेत्री होण्याचा विचार तिनं कधीच केला नव्हता.
अनुष्काला सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीनं किंवा लगेच मिळाल्या असं नाही. वयाच्या 15 व्या वर्षी अनुष्कानं सगळ्यात आधी रिजेक्शनचा सामना केला होता. बऱ्याचवेळा अनुष्काला देखील रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. अनेक वेळा तर तिला जाहिरात किंवा कोणत्याही प्रोजेक्ट्ससाठी सुरुवातीला कास्ट करण्यात यायचे मात्र, अखेर त्यात दुसरीच अभिनेत्री दिसायची. याविषयी बोलायला अनुष्काला आवडत नाही. कारण या वयात आपल्या दिसण्यावरून आपल्याला जज करण्यात येते आणि याचा खूप वाईट परिणाम होतो. इतरांप्रमाणेच जेव्हा अनुष्काला रिजेक्ट करण्यात यायचे तेव्हा ती देखील दु: खी व्हायची.
2008 मध्ये अनुष्काला आदित्य चोप्रानं 'रब ने बना दी जोडी' (Rab Ne Bana Di Jodi) या चित्रपटासाठी साइन केलं. या विषयी बोलताना अनुष्कानं एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा आदित्यनं (Aditya Chopra) तिला या चित्रपटासाठी साइन केलं. तेव्हा त्यानं तिला सांगितलं की तू काय आम्ही पाहिलेल्या सगळ्यात सुंदर मुलींपैकी एक नाहीस. आम्ही तुला या चित्रपटासाठी फक्त तुझ्यात असलेल्या टॅलेन्ट आणि ऑडिशनमध्ये जसा तू अभिनय केलास त्यावरून तुला कास्ट केलं आहे. आदित्य मला जेव्हा की मी सुंदर नाही असं बोलला तेव्हा मला वाईट वाटलं नाही तर, मला खूप बरं वाटलं, मला आनंद झाला की त्यानं जे आहे ते खरं सांगितलं.
'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात अनुष्कानं बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानसोबत (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. पण तरी देखील तिला पाहिजे तितकी लोकप्रियता मिळाली नाही. अनुष्काचा 'बॅंड बाजा बारात' (Band Baja Barat) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणी तिची मुलाखत देखील घेत नव्हते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक तिला ओळखू लागले. या चित्रपटानंतर तिला अनेकांनी सल्ले दिले की तू अशा चित्रपटांमध्ये काम कर जे 100 कोटींचा गल्ला करतील किंवा मग या ठरावीक अभिनेत्यासोबत काम कर. मात्र, अनुष्कानं असं काही केलं नाही. तिला असे चित्रपट करायचे होते जे पाहिल्यानंतर तिला अभिमान वाटेल. तिनं 7 वर्षांच्या करिअरमध्ये 6 चित्रपट केले आणि त्यानंतर तिनं बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये जागा मिळवली.
स्त्री यांविषयी असलेला सन्मान कसा वाढला या विषयी अनुष्कानं Bazaar या मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. एका Working -Mother ला तिच्या कामात आणि खासगी आयुष्यात बॅलेन्स आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे कोणालाही माहित नाही. या सगळ्यासाठी पितृसत्ताक समाज जबाबदार आहे. मी एक स्त्री आहे आणि याची जाणीव मला आई होईपर्यंत झालीच नव्हती. आज मला महिलांबद्दल माझ्या मनात खूप जास्त आदर आणि प्रेम आहे. मी नेहमीच महिलांसाठी बोलत आले, पण त्यांच्यासाठी असलेले प्रेम आणि आदर हा त्या अनुभवानंच येतो आणि त्यानंतर आपण अजून शक्तिशाली बनतो."
अनुष्कानं ही अभिनेत्री असण्यासोबत तिच्या स्पष्ट विचारांसाठी देखील ओळखली जाते. आज अनुष्का फक्त एक अभिनेत्रीच नाही तर त्यासोबत निर्माती देखील आहे.