अनुष्का शर्मानं घातलं विराट कोहलीचं शर्ट ! सोशल मीडियात फोटो व्हायरल

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी सतत चर्चेमध्ये असते.

Updated: Mar 13, 2018, 08:44 PM IST
अनुष्का  शर्मानं घातलं विराट कोहलीचं शर्ट ! सोशल मीडियात फोटो व्हायरल

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी सतत चर्चेमध्ये असते.

दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावरून विराट कोहली परतला असला तरीही निडास ट्रॉफी आणि त्यानंतर येणार्‍या आयपीएलच्या दौर्‍यामध्ये विराटचं शेड्युल पुन्हा व्यस्त होणार आहे.  

अनुष्का मुंबईत परतली 

विराटसोबत थोडा एकत्र वेळ घालवता यावा म्हणून अनुष्का शर्मा नुकतीच मुंबईत परतली आहे. सुई धागा या चित्रपटाच्या शुटिंगमधून थोडा वेळ काढून मध्यप्रदेशातून अनुष्का शर्मा परतली आहे. 

 

 

She is wearing his t-shirt!  #VirUshka  #MrAndMrsKohli 

A post shared by VirUshka  (@_virushkaa_) on

एअरपोर्टवरील कपड्यांवरून सोशल मीडीयामध्ये चर्चा 

विराट कोहलीसारखाच व्हाईट शर्ट अनुष्काने घातल्याने चर्चा रंगल्या आहेत. व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेल्या अनुष्काचे फोटो व्हायरल होत आहेत. विराट आणि अनुष्काच्या शर्टवर  ' State Of Mind' असं लिहलं आहे.  

इंस्टाग्रामवर शेअर केले खास फोटो 

विराट आणि अनुष्का त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत सहसा सोशलमीडियात किंवा मुलाखतीमध्येही बोलत नाहीत. मात्र नुकताच अनुष्कानं विराटच्या गालावर किस केल्याचा फोटो, मुंबईतील नव्या घरातील व्ह्यू असे फोटो काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

 

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

लग्नानंतर अनुष्का कामात व्यस्त 

अनुष्का शर्मा लवकरच शाहरूख खानसोबत 'झिरो' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर सध्या वरूण धवनसोबत अनुष्का 'सुई धागा' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे.