लग्नानंतर चक्क अनुष्का शर्मा बसस्टॅंडवर, दिसली वरुण धवनसोबत

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत विवाहबद्ध झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा चक्क लग्नानंतर प्रथमच बसस्टँडवर वरुणसोबत दिसली.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2018, 06:31 PM IST
 लग्नानंतर चक्क अनुष्का शर्मा बसस्टॅंडवर, दिसली वरुण धवनसोबत  title=
छाया - सोशल मीडिया

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत विवाहबद्ध झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा चक्क लग्नानंतर प्रथमच भोपाळच्या बसस्टँडवर वरुण धवनसोबत दिसली. दरम्यान, विराट-अनुष्काने लग्नानंतर काही दिवस परदेशात सुटी एन्जॉय केली. त्यानंतर ती मुंबईत होती. या दोघांनी मुंबई राहण्यासाठी महिन्याला १३ लाख रुपयांचा फ्लॅट भाड्याने घेतलाय. त्यानंतर अनुष्का चक्क भोपाळच्या बसस्टॅंटवर करते काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?

अनुष्का निळ्या रंगाचा साडीमध्ये

अनुष्का शर्मा हिने आपली सुटी संपवून कामाला लागली आहे. तिने आपला फोकस आता आगामी सिनेमावर केंद्रीत केलाय. लग्नानंतर तिचा 'सुई धागा' हा सिनेमा येतोय. या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती सध्या बिझी दिसत आहे. अनुष्काने अनेक सिनेमे हिट ठरलेत तसेच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दरम्यान, अनुष्का शर्मा आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येते. ग्लॅमरस अंदाजात दिसणार अनुष्का नुकतीच भोपाळच्या बस स्टँडवर साध्या निळ्या रंगाचा साडीमध्ये दिसली. अनुष्कासोबत वरुण धवनसुद्धा दिसत आहे.

अनुष्का फार चिंतेत 

अनुष्का 'सुई धागा' नंतर शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात दिसणार आहे. मात्र, बसस्टॅंडवर अनुष्का फार चिंतेत दिसली. तिची वरूण समजूत काढताना दिसतो आहे. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे दृश्यावरुन दिसत आहे. मात्र, 'सुई धागा' या सिनेमाचे शूटिंग आहे. बस स्टॉपवरच्या या सीनसोबतच चित्रपटाचे शूटिंग सुद्धा पूर्ण झाले आहे. सध्या अनुष्का यश राजच्या 'सुई धागा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुष्का आणि वरुणच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. 

 ममताच्या भूमिकेत दिसणार 

या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत आहे.  'मौजी' या नावाची व्यक्तीरेखा आहे. तरअनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणाऱ्या ममताच्या भूमिकेत दिसणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशातील आहे.  'सुई धागा' सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना सिनेमात दिसतील. शरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येतोय.