आयपीएल सट्टाप्रकरणी अरबाज खान माफीचा साक्षीदार

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खानला माफीचा साक्षीदार करण्यात येणार आहे.

Updated: Jun 2, 2018, 05:19 PM IST
आयपीएल सट्टाप्रकरणी अरबाज खान माफीचा साक्षीदार title=

ठाणे : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खानला माफीचा साक्षीदार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्याला अटक होणार नाही. ठाणे गुन्हे अनवेशण विभागाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत त्याने सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. यात २.७५ कोटी रुपये हरल्याचंही तो म्हणालाय.. आयपीएल मॅचेसवर आत्तापर्यंत सहा वेळा सट्टा लावल्याची कबुली आरबाज खान याने दिली आहे. अरबाज आणि सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान यांची एकत्र चौकशी करण्यात आली. 

सट्टेबाजीप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं हे समन्स बजावलं होतं. तीन दिवसांपूर्वी सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान याला ठाणे गुन्हे शाखेनं आयपीएलवर सट्टा लावल्याप्रकरणी अटक केली होती. सोनूच्या चौकशीत सट्टेबाज आणि बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. अरबाजसोबतच याप्रकरणी निर्माता पराग संघवी याचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अजून तीन चित्रपट निर्माते पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे.

पाहा व्हि़डिओ