प्रियांका- निकच्या नात्यात घटस्फोटाचं वादळ?

 याच सुरेख नात्यात सध्या वादळ आल्याचाही चर्चांनी डोकं वर काढलं आहे. 

Updated: Mar 31, 2019, 08:27 AM IST
प्रियांका- निकच्या नात्यात घटस्फोटाचं वादळ?

मुंबई : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत करत असल्याचं पाहायला मिळालं. पती निक जोनास याच्या कुटुंबासोबत एखाद्या सहलीवर जाणं असो किंवा एखाद्या समारंभाला सहकुटुंब हजेरी लावणं असो, प्रियांका यात नेहमीच आघाडीवर दिसली. किंबहुना सोशल मीडियावर प्रियांका आणि निकच्या पोस्ट पाहता त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांनाच पाहायला मिळत आहे. पण, याच सुरेख नात्यात सध्या वादळ आल्याचाही चर्चांनी डोकं वर काढलं आहे. 

प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले. मोठ्य़ा ताटामाटात पार पडलेला त्यांचा विवाह सोहळा अनेक प्रेमी युगुलांना #CouoleGoals देऊन गेला. पण, त्यांच्या या नात्यात आता काही गोष्टी बिघडल्याचं वृत्त एका मासिकाच्या हवाल्यातून मिळत आहे. 'ओके' या मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या वृत्ताने 'निक्यांका'च्या चाहत्यांनाही धक्काच बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'देसी गर्ल' आणि निकच्या नात्यावर टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सुरुवातीला प्रियांका- निकच्या नात्यात सुरुवातीला फार सहजता होती. पण, लग्नानंतर आता मात्र ती या नात्यात वरचढ असल्याचं भासू लागलं, असं म्हटलं जात आहे. या नात्यात नेमकं असं कोणतं वादळ आलं आहे याचीच चिंता सध्या चाहत्यांच्याही वर्तुळात पाहायला मिळत आहे. प्रियांकाच्या निकटवर्तीयांकडून या बातमीला कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, तरीही कलाविश्वात मात्र याविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.