अरिजित सिंह सध्या आपल्या इंटरनॅशनल दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच गाणं आणि त्याने केलेली कृती सगळ्याच गोष्टी चर्चेत आहे. नुकताच्या त्याच्या कॉन्सर्टमधला एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अरिजित सिंह एका चाहत्याने स्टेजवर ठेवलेले पदार्थ अतिशय नम्रपणे उचलून क्रू मेंबरकडे देताना दिसत आहे. अरिजित सिंह एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेक्षकाची माफी मागितली आणि म्हणाला, 'मला माफ करा. पण हे स्टेज माझं मंदिर आहे. तुम्ही यावर जेवण ठेवू शकत नाही.' अरिजीतच्या या कृतीने प्रेक्षकांच मन जिंकल आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अरिजित सिंहच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये एक फॅन म्हणाला आहे की, खरंय.... हीच खरी भक्ती आहे. आपल्या कामाप्रती असलेली भक्ती आणि प्रेम. तर दुसरा चाहता म्हणाला की, खरं प्रेम... तो किती नम्रपणे चाहत्याशी वागला. या ठिकाणी तो रागवू शकला असता. अरिजित खरा लिजंड असल्याचं म्हटलं आहे.
अरिजित सिंह लंडनमध्ये कार्यक्रमासाठी गेला आहे. या ठिकाणी त्याने एकट्याने संपूर्ण स्टेज गाजवला होता. अरिजित सिंहने यावेळी BTS व्हिडीओ देखील शेअर केले आहे.
Arijit Singh - I am sorry, The stage is my temple you can't put food here #ArijitSingh pic.twitter.com/4GLJBmeet9
— Arijitsinghupdates2.0 (@Arijitnews) September 17, 2024
अरिजित सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरिजीत 'ए दिल है मुश्किल' गाताना ऐकू येत आहे. परफॉर्मन्सच्या मध्यभागी एका चाहत्याने स्टेजवर गायकाच्या पायाजवळ कोल्डड्रिंक आणि उरलेले अन्न ठेवले. अरिजीतने ताबडतोब हात पुढे केला आणि अन्न उचलून क्रूला दिले. यादरम्यान अरिजीतने परफॉर्मन्समध्ये व्यत्यय आणल्याबद्दल माफी मागितली आणि 'स्टेज हे माझे मंदिर आहे, तुम्ही येथे अन्न ठेवू शकत नाही', असे सांगितले.
एवढंच नव्हे तर या व्हिडीओनंतर लाईव्ह शो दरम्यान अशी कृती केल्यामुळे त्या व्यक्तीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी देखील स्वच्छतेचा विचार करणे गरजेचे असल्याचं सांगण्यात येत आहे. अरिजित सिंहने यावेळी ब्रिटिश गायक एड शीरनसोबत स्टेज शेअर केला आहे.