अर्जून मलायकाचं ब्रेकअप? अभिनेत्याचे मलायका नाही तर या अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे.

Updated: Jul 16, 2022, 07:24 PM IST
अर्जून मलायकाचं ब्रेकअप? अभिनेत्याचे मलायका नाही तर या अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या अर्जून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान, अर्जुन कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो मलायकावर नाही तर दुसऱ्या अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अर्जुन कपूर मलायकाच्या प्रेमात आहे की नाही. या फोटोंमध्ये अर्जुन कपूरसोबत मलायका अरोरा दिसत नसून तारा सुतारिया दिसत आहे. या फोटोंमध्ये अर्जुन कपूर अभिनेत्री तारासोबत दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचा एक भाग आहे.

या चित्रपटात अर्जुनसोबत तारा सुतारियाही दिसणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही स्टार्स एकत्र प्रमोशन करत आहेत. हे फोटो प्रमोशनदरम्यान काढण्यात आले आहेत. जेव्हा हे कलाकार मस्ती करताना दिसले होते. अभिनेत्री आणि अर्जुन कपूर खूप मस्ती करत असल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे.

कधी तो तिला मिठी मारत असल्याचं दिसतं तर कधी अर्जुनच्या पाठीवर चढून मजा घेत असते. तारा आणि अर्जुन एका चित्रपटात एकत्र काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तारा आणि अर्जुन आजकाल त्यांच्या आगामी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. त्या दरम्यान अभिनेत्री देखील अतिशय मस्त पोशाखात दिसत आहे.

सोशल मीडियावर अर्जुन आणि ताराचे सगळेच कोझी फोटो व्हायरल होत आहेत. पण हे फोटो पाहून मलायका अरोराला जेलसी होणार नाही ना हे आता पाहवं लागेल.  चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन आणि तारा व्यतिरिक्त 'एक व्हिलन रिटर्न्स' मध्ये जॉब अब्राहम आणि दिशा पटानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे