मुंबई : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. सध्या हा अभिनेता त्याच्या 'शमशेरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने त्याचा को-स्टार संजय दत्तशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्यात चांगलं बाँड आहे. सध्या हे दोन्ही स्टार्स त्यांच्या आगामी 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वास्तविक, एका मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितलं होतं की, 'जेव्हा मी बर्फी आणि रॉकस्टारमध्ये काम करत होतो, तेव्हा मी वर्कआउटसाठी संजय दत्तच्या जिममध्ये जायचो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, 'तू इथे दोन वर्षांपासून जिम करतोय, पण तुझी बॉडी कुठे आहे'.
इतकंच नाही तर संजय दत्तने त्याच्या 'बर्फी' चित्रपटासाठी गंमतीत त्याला विचारलं होतं की, संजय दत्त म्हणाला की, तू सध्या बर्फी सिनेमा करतोस. तर तुझा पुढचा चित्रपट कोणता असेल? पेढा? की लाडू?' रणबीर कपूरच्या करिअरमधील बर्फी हा सिनेमा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात रणबीरसोबत प्रियांका चोप्रा देखील दिसली होती.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्तशिवाय वाणी कपूर देखील आहे. यानंतर रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात पत्नी आलिया भट्टसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.