मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मलायका अरोरासोबतचं नाते त्याने कधीही कोणापासून लपवलेलं नाही. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. मलायका आणि अर्जुन जवळपास चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. मलायका आणि अर्जुन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता देखील अर्जुन त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे.
अर्जुन चर्चेत येण्याचं कारण ठरत आणि दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण 7' शो. 'कॉफी विथ करण' शो पुन्हा सुरु झाला आहे. यावेळी करणने अर्जुनला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. येत्या एपिसोजमध्ये अर्जुनसोबत बहिण सोनम कपूर देखील उपस्थित असणार आहे. एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शोमध्ये सोनमसोबत पोहोचलेला अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोराविषयी बोलताना दिसणार आहे. शोमध्ये करण अर्जुनला विचारतो की त्याने मलायकाचा नंबर फोनमध्ये कोणत्या नावाने सेव्ह केला आहे? यावर उत्तर देताना अर्जुन म्हणतो, 'मला तिचं नाव मलायका आवडतं.' म्हणजेच अर्जुनने मलायकाचा फोन नंबर तिच्या नावाने म्हणजेच मलायका म्हणून सेव्ह केला आहे.
अर्जुन आणि मलायका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही त्यांच्या नात्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. वयातील अंतरामुळे दोघांचे नातेही चर्चेत आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे दोघांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं.