मलायका अरोरा आणि अर्जून कपूरच्या private vacation चे फोटो आले समोर

अर्जूनने काढले मलायकाचे खास फोटो, private vacation फोटो तुम्ही पाहिले का?

Updated: Jun 25, 2022, 10:18 AM IST
मलायका अरोरा आणि अर्जून कपूरच्या private vacation चे फोटो आले समोर  title=

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अर्जुन कपूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी दोघं पॅरिसमध्ये होते. त्यांनी प्रायव्हेट वेकेशनचा आनंद लुटला. यावेळी अर्जून आणि मलायकाने खास फोटो काढले. त्यातले काही फोटो आता चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. 

या दोघांनी एकत्र फोटो काढलेले अजून समोर आले नाहीत मात्र एकमेकांचे कॅन्डिड फोटोशूट केलेलं इन्स्टाग्राम स्टोरिमधून समोर आलं आहे. यामध्ये काही खास फोटो आहेत. 

अर्जूनच्या बर्थडे सेलिब्रेशनवेळी मलायकाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. तिचा उत्साह आवडला असं अर्जून कपूरने एक फोटो शेअर करत म्हटलं आहे. अर्जून तिच्यासोबत सुंदर वेळ घालवत असल्याचंही या फोटोंमधून दिसत आहे 

अर्जूनच्या 26 जूनला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दोघंही सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. मलायकाने अर्जुनच्या बर्थडेची खास तयारीही केली आहे. अर्जूनने मलायकाचे काही खास हिडन फोटो काढले आणि ते शेअर केले. त्यावर स्पॉटेड असं कॅप्शनही दिलं आहे. 

या सुट्ट्यांचा आनंद ती कसा घेते हे मलायकाने चाहत्यांसोबत फोटो शेअर करून सांगितलं आहे. एका फोटोमध्ये मलायका अजब लूक देताना दिसत आहे. थोडी टेन्शनमध्ये असल्याचंही दिसत आहे. 

चाहते आता या दोघांचा एकत्र फोटो कधी पाहाता येतो याची वाटत पाहात आहेत. मलायका आणि अर्जूनने अजून दोघांचा एकमेकांसोबत काढलेला फोटो शेअर केला नाही. चाहत्यांना या फोटोची प्रतीक्षा आहे.