PHOTO: १३ वर्षांनंतर पुन्हा अर्जुनने दिली गुडन्यूज; शेअर केला गर्लफ्रेन्डसोबतचा फोटो

अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड गॅबरिला आफ्रिकी मॉडेल आहे

Updated: Apr 24, 2019, 01:49 PM IST
PHOTO: १३ वर्षांनंतर पुन्हा अर्जुनने दिली गुडन्यूज; शेअर केला गर्लफ्रेन्डसोबतचा फोटो title=

नवी दिल्ली : बॉलिवूड हॅन्डसम हंक अभिनेता अर्जुन रामपाल सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आहे. पहिली पत्नी मेहर जेसिकासोबत झालेल्या घटस्फोटानंतर अर्जुन गर्लफ्रेंड गॅबरिलासोबत असलेल्या रिलेशनशिपबाबत चर्चेत आहे. गेल्या वर्षापासून अर्जुन आणि गर्लफ्रेन्ड गॅबरिला एकत्र राहत असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान अर्जुनने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन गर्लफ्रेंड गॅबरिलासोबतचा एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरु आहे. 

 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72) on

गॅबरिला आफ्रिकी मॉडेल असून 'सोनाली केबल' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72) on

गेल्या वर्षी अर्जुन रामपालने २० वर्षांपासूनचं नातं तोडत पत्नी मेहर जेसिकाशी घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नीपासून अर्जुनला माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. अर्जुन सोशल मीडियावर नेहमी मुलींसोबतचे फोटो शेअर करत असतो. परंतु अर्जुनच्या मुली नेहमीच मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर असतात. 

 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72) on

२००१ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकवणाऱ्या या अभिनेत्याला खलनायकाच्या भूमिकेतून अनेकांची पसंती मिळाली होती. जबलपुरमध्ये जन्मलेल्या अर्जुन रामपालने २००१ साली 'प्यार, इश्क और मोहब्बत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटासाठी त्याला २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमीकडून 'फेस ऑफ द इयर'चा पुरस्कार देण्यात आला होता. २००७ साली आलेल्या 'ओम शांती ओम' चित्रपटात त्याने खलनायकाची जबरदस्त भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पलटन' चित्रपटासाठी त्याची प्रशंसा केली गेली.