अर्जुन रामपाल ZEE5 च्या वेब सिरीजमध्ये झळकणार

अर्जुन रामपालचा डिजीटलच्या विश्वात प्रवेश

Updated: Dec 12, 2018, 06:00 PM IST
अर्जुन रामपाल ZEE5 च्या वेब सिरीजमध्ये झळकणार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आता डिजीटलच्या विश्वात प्रवेश करत आहे. वेब सीरिज 'द फाइनल कॉल'च्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखिका प्रिया कुमार यांचं पुस्तक 'आय विल गो विद यू' यावर आधारीत ही वेबसिरीज असणार आहे. अर्जुन रामपाल याने म्हटलं की, 'मी 'द फायनल कॉल'(The Final call) वेब सिरीजसाठी Zee5 च्या माध्यमातून डिजीटलमध्ये पदार्पण करत आहे. ही खूप वेगळी कथा आहे आणि यामध्ये तुम्ही मला वेगळ्या रुपात पाहू शकणार आहात.'

अर्जुनने म्हटलं की, आम्ही काश्मीरमधील शुटींग पूर्ण केली आहे. दर्शकांसमोर ती सादर करण्यासाठी आम्ही अजून वाट नाही पाहू शकत.' ही सीरिज 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी5 इंडियाचे बिजनेस हेड मनीष अग्रवाल यांनी यावेळी म्हटलं की, द फाइनल कॉल पुस्तकावर आधारीत या वेब सिरीज हाच आमचा पहिला प्रयत्न आहे. अर्जुन रामपाल या भूमिकेसाठी पूर्णपणे फीट आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Spinning like Villian. #playboydelhi #dj #soundcraft

A post shared by Arjun (@rampal72) on

द फाइनल कॉल प्रेक्षकांना जीवन आणि मृत्युचा प्रवास सांगणार आहे. जी5 इंडियाचे कार्यक्रम प्रमुख, 'अपर्णा अचरेकर यांनी म्हटलं की, द फाइनल कॉल पुस्तकाची कथा ही उत्साहित करणारी आहे. ही कथा फारच वेगळी आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mood. Stand up for what you believe in. Even if it means to stand alone. #mood #saturdaythoughts

A post shared by Arjun (@rampal72) on