Audi-Ferrari मधून फिरणाऱ्या आर्यन खानची जेलमध्ये आहे अशी अवस्था

ड्रग्स प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा त्रास कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.

Updated: Oct 21, 2021, 06:54 PM IST
 Audi-Ferrari मधून फिरणाऱ्या आर्यन खानची जेलमध्ये आहे अशी अवस्था

मुंबई : ड्रग्स प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा त्रास कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. देशातील सगळ्यात मोठ्या वकिलांचे सगळे युक्तिवाद आर्यनला वाचवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यन खान सध्या आर्थर जेलमध्ये आहे. एकेकाळी राजकुमारासारखी आलिशान लाईफस्टाईल जगणाऱ्या आर्यन खानची जेलमध्ये वाईट अवस्था झाली आहे.

आलिशान लाईफस्टाईल आणि महागड्या कपड्यांचा शौकीन आर्यन खान आता तुरुंगाच्या चार भिंतींमध्ये आपले दिवस काढत आहे. आता तो मुक्त पक्ष्याप्रमाणेच मोकळे आकाश पाहण्याची वाटत पाहत आहे, मात्र कोर्टाभोवती फिरत असताना देखील. मुंबईतील सर्वात महागड्या घरांपैकी एका 'मन्नत'मध्ये राहणाऱ्या आर्यनला तुरुंगाच्या नियमांनी बांधलं आहे. कारागृहाच्या हद्दीत त्याचं खाणं -पिणंही कठीण झालं आहे. आर्यन खानकडे ऑडी ते फेरारीपर्यंत अनेक आलिशान गाड्या आहेत. मात्र आता तो एनसीबीच्या वाहनांमध्ये अनेक लोकांना वेढलेला दिसतो.

आर्यन खान सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नाही. पण त्याला पार्टी करणं आणि फिरणं खूप आवडतं. पण कारागृहाच्या आत त्याची अवस्था अशी आहे की त्याला फक्त साडेचार हजार रुपयांमध्येच काम चालवावं लागत आहे. ज्यामधून तो कँटीनमधून त्याला हवं ते जेवण खरेदी करू शकतो.