समंथा प्रभू आणि प्रीतमच्या अफेअरच्या चर्चाना एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे वेगळं वळण, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नागा चैतन्य आणि सामंथा प्रभू या साऊथच्या स्टार जोडप्यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर आता अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. 

Updated: Oct 21, 2021, 06:30 PM IST
समंथा प्रभू आणि प्रीतमच्या अफेअरच्या चर्चाना एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे वेगळं वळण, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : नागा चैतन्य आणि सामंथा प्रभू या साऊथच्या स्टार जोडप्यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर आता अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र, अभिनेत्री श्री रेड्डीने यासंदर्भात वक्तव्य करुन त्यांच्या अफेअरच्या बातमीवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाची आणखी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्यामुळे लोकांना या प्रकरणाबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुक्ता वाढली आहे.

अभिनेत्री श्री रेड्डीने सामंथा प्रभूच्या अफेरच्या बातमीला पूर्णपणे चुकीची सांगितली आहे. खरंतर, समोर आलेल्या बातम्यांमध्ये दावे करण्यात आले होते की सामंथाचे तिच्या स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरसोबत अफेअर होते, ज्यामुळे ती पती नागापासून विभक्त झाली. परंतु श्री रेड्डीच्या वक्तव्यामुळे या बातमीला वेगळं वळण आलं आहे.

एका मुलाखतीत श्री रेड्डी म्हणाली की, प्रीतम समलिंगी आहे, त्यामुळे सामंथा आणि त्याच्यातील नात्याच्या बातम्या खरं असण्याची शक्यता नाही. त्याचवेळी प्रीतमनेही या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. प्रीतमने सांगितले होते की, त्याचे नाव समंथाशी जोडले जात असल्याची बातमी ऐकून त्याला खूप वाईट वाटले. त्याने लोकांना दुर्भावनापूर्ण वागू नये असे म्हटले आहे, "सर्वांना माहीत आहे की मी समंथाला जीजी म्हणजेच बहिण म्हणतो. अशा स्थितीत आमच्यात कसं काय अफेअर्स अशू शकतं?"

यावर बोलताना सामंताने सोशल मीडियावर लिहिले, 'वैयक्तिक संकटात तुमच्या भावनिक पाठिंब्याने मला खूप पाठिंबा दिला आहे. काळजी आणि खोट्या अफवांमध्ये माझा बचाव केल्याबद्दल सर्वांचे आभार. लोक मला संधीसाधू म्हणतात. घटस्फोट स्वतः एक वेदनादायक प्रक्रिया आहे. मला यातून सावरण्यासाठी वेळ द्या.'

त्याने सामंथा म्हणाली, "लोकांचे म्हणणे आहे की, माझे अफेअर आहे, मला मुलं नको आहे, एवढच काय तर मी गर्भपात देखील केला आहे. घटस्फोट घेणे ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे. यावर मात करण्यासाठी मला एकटे सोडा. माझ्यावर वैयक्तिक हल्ले चालू आहेत. पण मी वचन देतो की, त्यांना जे पाहिजे ते बोलू द्या परंतु ते मला तोडू शकणार नाही."

सामंथा आणि नागा यांचे 2017 मध्ये लग्न झाले पण गेल्या काही दिवसात त्यांच्यात दुराव्याच्या बातम्या समोर आल्या. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात त्यांनी घटस्फोटाची घोषणाही केली. या बातमीने काही चाहत्यांना आश्चर्य वाटले, तर अनेक चाहते सामंथाच्या या निर्णयाचे समर्थन करत होते. सध्या, सामंथा घटस्फोटानंतर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.