महाराष्ट्र भूषण मिळाल्यानंतर आशा भोसले यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रासाठी गायलं गाणं

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला 

Updated: Mar 25, 2021, 10:08 PM IST
महाराष्ट्र भूषण मिळाल्यानंतर आशा भोसले यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रासाठी गायलं गाणं title=

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आशा भोसले यांनी प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, हे गाणं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेसाठी गायलं आहे, तसेच या निमित्ताने केक कापताना सर्व मराठी लोकांसाठी हा केक कापतेय, सर्वांसाठी ही आनंदाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे...

 गायिका आशा भोसले यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.  निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.