मुंबई : झगमगत्या विश्वातील जास्त चर्चेत येणारे विषय म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशनशिप. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन ही जोडी सध्या तुफान चर्चेत आहे. आता एका सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर जगन्नाथ गुरुजी (Pandit Jagannath Guruji) यांनी मलायका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. 2022 साली मलायका आणि अर्जुन लग्न करतील अशी भविष्यवाणी जगन्नाथ गुरुजी यांनी केली आहे. मलायका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल जगन्नाथ गुरुजी यांची भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरत आहे.
जगन्नाथ गुरुजी यांच्या म्हणण्यानुसार, 2022 साली मलायका-अर्जुन विवाह बंधनात अडकतील. अर्जुन भावुक आहे, तर दुसरीकडे मलायका प्रॅक्टिकल आहे. अनेकदा टिकेचा सामना करून देखील त्यांच्या नात्यात कधी कडवटपणा आला नाही. दोघांना कायम अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांचे चाहते विचारत आहेत.
लग्न झालं तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नव्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती करू शकतात. असं देखील जगन्नाथ गुरुजी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मलायका आणि अर्जुन एकमेकांसाठी लकी ठरू शकतात असं म्हणालया हरकत नाही.
भविष्यवाणीप्रमाणेच दोघांच्याही आयुष्यात मोठे बदल होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी लेडी लव्ह मलायका अरोराच्या घराजवळच त्याने हे घर घेतले आहे आणि अशा प्रकारे अर्जुन मलायकाचा नवा शेजारी बनला आहे. त्यांच्यातील बॉडिंग आता दिवसेंदिवस घट्ट होताना पाहायला मिळत आहे.
अर्जुनने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातील स्काय व्हिला येथे आपला नवीन आशियाना तयार केला आहे. अर्जुनने नवं घर 25 व्या मजल्यावर आहे. त्याचबरोबर घराची किंमत 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.