'तुझी कंबर अशी का?' 12व्या वर्षी इलियाना झाली होती बॉडी शेमिंगची शिकार

आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. पण...

Updated: Apr 27, 2021, 08:30 PM IST
'तुझी कंबर अशी का?' 12व्या वर्षी  इलियाना झाली होती बॉडी शेमिंगची शिकार

मुंबई : बॉडी शेमिंग अशी एक गोष्ट आहे, ज्याचा सामना फक्त कलाकारांचं नाही तर सर्व सामान्य महिलांना देखील करावा लागतो. काधी लठ्ठपणामुळे तर कधी शरीर बारीक असल्यामुळे लोक विनोद करतात. अभिनेत्री  इलियाना डिक्रुझ देखील बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी इलियाना  बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. यादरम्यानचा अनुभव तिने शेअर केला आहे. बॉलिवूड बबलला मुलाखतीत तिने तिच्या लहानपणाचा अनुभव सांगितला आहे. 

'मला लक्षात आहे, ते खूपच विचित्र होते कारण तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. 12 वर्षांची होती तेव्हा मी बॉडी शोमिंगचा शिकार झाली. लोक मला विचारायचे तुझ्या शरीराचा मागचा भाग  एवढा मोठा का आहे? आणि मला ते तेव्हा कळत नव्हतं. तुम्हाला वाटतं तुम्ही ठिक आहात. त्यानंतर कोणीतरी येत आणि तुम्हाला म्हणतं, तुम्ही त्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवता. '

इलियाना पुढे म्हणाली, 'लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर काही फरक पडला नाही पाहिजे. मी रोज बॉडी शोमिंगचा शिकार होते. इन्स्टाग्रामवर मला रोज असे 10 मेसेज येतात. त्यामुळे मी सतत लोकांना सांगते तुमच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं  हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची काही गरज नाही.'

सांगायचं झालं तर, याआधी देखली अनेक अभिनेत्रींनी त्यांचा अनुभव जगासमोर मांडला आहे. आजचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. पण कोणाबद्दल चूकीचं बोलण्याचा आणि विनोद करण्याचा अधिकार कोणालाचं नाही.