KL Rahul Comments on Athiya Shetty Photo: सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहून या दोघांच्या अफेअर्सची खूप चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा ते दोघं चर्चेत आले आहेत. आथिया शेट्टीने नुकतेच एक बोल्ड फोटोशुट आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर शेअर केले आहे. त्यावर के. एल राहूल कमेंट केली असून कमेंटमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सध्या अथिया शेट्टी बॉलीवूडमध्ये फारशी सक्रिय नाही. अभिनयापासून दूर असलेली अथिया सध्या इन्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवते आहे. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने बॅकलेस टॉपमध्ये पोज देत स्वतःचा एक सेक्सी फोटो शेअर केला आहे. आथियाच्या फोटोनं इंटरनेटचं वातावरण गरम केलं आहे.
अथियाने "All lights" या कॅप्शनसह फोटो शेअर केला. तिच्या अनेक फॉलोअर्सनी तिच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यात तिचा प्रियकर केएल राहुल पण आहे.
केएल राहूलने अथियाच्या फोटोवर कमेंट करत फायर इमोजी शेअर केला आहे. सुनील शेट्टीनेही या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. के एल राहूलसोबतच हार्दिक पांड्यानेही फायर इमोजी टाकला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल गुप्तता ठेवली नाही कारण हे दोघं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. मंगळवारीही त्या दोघांनी त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.
गेल्या महिन्यात अशी अफवा पसरली होती की अथिया आणि राहुल तीन महिन्यांत लग्न करणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार असेही कळले होते की त्या दोघांच्या घरी लग्नाची बोलणीही सुरू झाली आहे.
लग्नाबाबत काय आहे अथिया शेट्टीचं म्हणणं... - अथियाने एका मुलाखतीदरम्यान लग्नाबाबत अद्याप कसलं प्लॅनिग नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर सुनील शेट्टीनेही लग्नाच्या अफवा खोट्या असल्याचं म्हटले आहे. आम्ही कसलेच प्लॅनिंग करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.