'मला स्वतःची लाज वाटते'; अयोध्येच्या राम मंदिराला विरोध केलेल्या अभिनेत्याने मागितली जाहीर माफी

Ayodhya Ram Mandir : रणवीर शौरीला लाज वाटते की, तो अयोध्येतील राम मंदिराच्या विरोधात होता. रणवीरने माफी मागितली असून श्री रामच्या मूल्यांवर उभे न राहिल्यामुळे मला लाज वाटत असल्याचे म्हटले आहे. रणवीर शौरीच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 31, 2023, 04:25 PM IST
'मला स्वतःची लाज वाटते'; अयोध्येच्या राम मंदिराला विरोध केलेल्या अभिनेत्याने मागितली जाहीर माफी title=

22 जानेवारीला राम मंदिरात भगवान श्रीरामाचा अभिषेक सोहळा होणार आहे. मात्र त्या अगोदरच अभिनेता रणवीर शौरीने माफी मागितली आहे. अयोध्या आणि भगवान रामवर असे काही बोलले आहे की, सगळेच हैराण झाले आहेत. रणवीर शौरीने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर अगोदरच माफी मागितली आहे. पूर्वी रणवीर शौरी मंदिराच्या बांधकामाच्या विरोधात होतो आणि तिथे हॉस्पिटल किंवा स्मारक बांधले जावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र आता रणवीर शौरीने माफी मागितली आहे.

22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी 15 जानेवारीला गर्भगृहात रामललाची मूर्ती बसवण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अभिषेक सोहळ्यासाठी सुमारे 8 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये दक्षिण चित्रपट उद्योगातील 7 आणि बॉलिवूडमधील 12 व्यक्तींचा समावेश आहे. सर्वत्र राम मंदिराचा उत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, रणवीर शौरीने सर्वांची माफी मागितली आहे. यावर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

'मला लाज वाटते, श्रीरामाच्या मंदिराला विरोध केला'

रणवीर शौरीने लिहिले की, 'मी अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणाऱ्या अनेक हिंदूंपैकी एक होतो आणि त्या जागी स्मारक किंवा हॉस्पिटल बांधले जावे अशी माझी इच्छा होती. जेणेकरून या मुद्यावरुन होणार वाद शांत होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपवण्यासाठी मी त्यावेळी तसं बोललो पण मला लाज वाटते की, मी मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आणि त्यांच्या मूल्यांसाठी उभा राहिलो नाही.

मंदिरासाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्यांचे अभिनंदन

रणवीर शौरीने पुढे राम मंदिराच्या उभारणीसाठी दीर्घकाळ लढणाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, 'सत्य आणि न्यायासाठी ही दीर्घ आणि कठीण लढाई लढणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. मी प्रभू रामाची माफी मागतो आणि त्यांना भविष्यासाठी बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो. आपल्या या महान भूमीत धर्म सदैव टिकून राहो आणि सर्व भारतीयांसाठी शाश्वत शांती आणि समृद्धी घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो. जय श्री राम.'