आयुष-आर्पिताचे बोल्ड फोटो पाहून सलमानलाही बसेल धक्का

आयुष कायम अर्पितासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतो.  

Updated: Mar 27, 2021, 09:48 AM IST
आयुष-आर्पिताचे बोल्ड फोटो पाहून सलमानलाही बसेल धक्का title=

मुंबई : अर्पिता खान शर्मा अभिनेता सलमान खानची लाडकी बहिण आहे. कित्येकदा सलमान आणि अर्पिता एकत्र कोणत्याही कार्यक्रमात किंवा  पार्टीमध्ये दिसतात. सध्या सलमानची ही लाडकी बहिण अर्पिता चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसचं आहे. अर्पिता आणि पती आयुष शर्माचे बोल्ड फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत.  अभिनेता आयुष शर्माने पत्नी अर्पितासोबत काही फोटो पोस्ट केले आहे. हे फोटो पाहून सलमानलाही धक्का बसेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

आयुष कायम सोशल मीडियावर  अर्पिता आणि  मुलांसोबत फोटो पोस्ट करत असतो. पण आता त्याने पोस्ट केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अर्पितासोबत फोटो शेअर करत आयुष कॅप्शनमध्ये, 'नेहमी मला पाहाताना...' असं लिहीलं आहे. फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहात आहेत. 

आयुष लवकरच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. सलमान आणि आयुष 'अंतिम' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.