close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉलिवूडच्या पहिल्या 'सुपरस्टार'ला मागे टाकत आयुष्मान खुरानाने रचला इतिहास

बिगबींना देखील टाकलं मागे 

Updated: Nov 9, 2019, 03:53 PM IST
बॉलिवूडच्या पहिल्या 'सुपरस्टार'ला मागे टाकत आयुष्मान खुरानाने रचला इतिहास

मुंबई : हिंदी सिनेमामध्ये राजेश खन्नांच्या नंतर बॉलिवूडचा हिरो म्हणून आयुष्मान खुरानाकडे पाहिलं जातंय. सलग सात हिट सिनेमे देणाऱ्या आयुष्मान खुराना हा दुसरा कलाकार आहे. एवढंच नव्हे तर आयुष्मान खुरानाने अमिताभ बच्चन यांचा देखील रेकॉर्ड तोडला आहे. अमिताभ यांचे सलग सहा सिनेमे हिट झाले होते यानंतर आयुष्मान खुरानाचे सलग 7 सिनेमे हिट झाले आहेत. 

आयुष्मान खुरानाचा 'बाला' हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. आयुष्मान खुराना हा बॉलिवूडला मिळालेला 'परिस' आहे. तो ज्या सिनेमांना हात लावतो तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होतो. 'ड्रीम गर्ल' या सिनेमानंतर सलग हिट सिनेमे देत हॅट्रिक केली आहे. 'बाला'ने देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'बाला' सिनेमाने 'ड्रीम गर्ल'चा रेकॉर्ड देखील तोडला आहे. 

'स्त्री' सिनेमातून दिग्दर्शनात डेब्यू केलेल्या अमर कौशिकच्या 'बाला' सिनेमाने पहिल्या दिवशी 10 करोड 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. 'ड्रीम गर्ल'ने पहिल्या दिवशी 10 करोड 5 लाख रुपयांची कमाई केली आहे. 10 लाख 'बाला' सिनेमाने जास्त कमाई केली आहे. 

'बाला' आणि 'ड्रीम गर्ल' या दोन्ही सिनेमाच्या रिलीजमध्ये खूप कमी दिवसांच अंतर होतं. असं असताना देखील आयुष्मानच्या दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे दोन्ही सिनेमे हिट ठरले आहे. यात पूर्णपणे आयुष्मानचं यश आहे. 'बाला, सिनेमातून आम्ही खूप ठोस आणि मजबूत असा सामाजिक संदेश मनोरंजन स्वरूपात मांडला आहे.', असं आयुष्मान सांगतो.