'बाहुबली'च्या दिग्दर्शकाकडे प्रेक्षकांकडून 'रामायण' वर सिनेमा बनवण्याची मागणी

रामायणावर सिनेमा बनवण्याची मागणी

Updated: May 5, 2020, 05:26 PM IST
'बाहुबली'च्या दिग्दर्शकाकडे प्रेक्षकांकडून 'रामायण' वर सिनेमा बनवण्याची मागणी

मुंबई : लॉकडाऊनमध्ये घरीच असलेल्या लोकांसाठी सरकारने पुन्हा एकदा रामायणाचं पूर्नप्रक्षेपण सुरु केलं होतं. या दरम्यान रामायनाने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये १६ एप्रिलला जगभरातील सर्वात जास्त लोकांनी रामायण पाहिल्याचं समोर आलं आहे. पण त्यानंतर आता बाहुबलीचे दिग्दर्शक असलेले एसएस राजामौली हे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले आहेत.

एसएस राजामौली यांच्याकडे त्यांचे फॅन्स रामायणावर सिनेमा बनवण्याची मागणी करु लागले आहेत. हिंदू धर्मातील ही महागाथा सिल्वर स्क्रीनवर आणण्याची मागणी ट्विटरवर होत आहे. ट्विटर पर #RajamouliMakeRamayan हॅशटेग ट्रेंड होऊ लागला आहे.

दूरदर्शनने ट्विट करत माहिती दिली होती की, जगभरात १६ एप्रिलचा रामायणाचा एपिसोड ७.७ कोटी लोकांनी पाहिला. त्यानंतर रामायण सर्वाधिक लोकांनी पाहिलेली पहिली सिरीअल बनली आहे. १६ एप्रिलच्या या एपिसोडने नवा विक्रम बनवला आहे.