अभिनेत्री रिमी सेनचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का; फोटो पाहून ओळखणंही कठीण

रिमी सेनने सलमानसोबत हिट चित्रपट दिले आहेत. 

Updated: Jul 22, 2022, 10:17 PM IST
अभिनेत्री रिमी सेनचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का; फोटो पाहून ओळखणंही कठीण

मुंबई : रिमी सेनने सलमानसोबत हिट चित्रपट दिले आहेत. तर हंगामा या कॉमेडी चित्रपटातही ती दिसली होती. बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीतून गायब असलेली ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली. खरंतर रिमी सेन एका मोठ्या फसवणुकीची बळी ठरली होती. एका बिझनेसमनने तिची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील रौनक जतिन  व्यावसायिकाने गुंतवणुकीच्या नावाखाली रिमीची ४.१४ कोटी रुपयांची फसवणूक केली.

'हंगामा' आणि 'धूम' सारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलं. मात्र, काही चित्रपट दिल्यानंतर तिने इंडस्ट्री सोडली. 'क्युंकी' चित्रपटात सलमान खानसोबत दिसणारी ही अभिनेत्री धूम सीरिजच्या पहिल्या चित्रपटात अभिषेक बच्चनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर, ती हेरा फेरी 2 आणि गरम मसाला सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली.

रिमी सेन देखील बिग बॉस 8 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आजकाल ती चित्रपटांपासून दूर असून राजकारणात नशीब चमकवत आहे.  रिमी सेन शुभमित्र या नावाने ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. तिचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत, तिचा नवा लूक पाहून ती खूपच बदललेली दिसत आहे.

एका मुलाखतीत रिमी सेन म्हणाली होती की, मी इंडस्ट्रीपासून दूर आहे. खरं तर, मला नवीन गोष्टींचा शोध घ्यायचा होता आणि मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करायचे होते. पण असं झालं नाही. अभिनयासोबतच रिमीने निर्मिती आणि दिग्दर्शनामध्ये हात आजमावला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आर्थिक अडचणींमुळे रिमीने वयाच्या १४ व्या वर्षी कोलकाता येथे प्रादेशिक संगीत आणि जाहिरात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने 2003 मध्ये विजय गलानीच्या हंगामामधून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. रिमी सेन शेवटची 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या शागिर्द या चित्रपटात दिसली होती.