मुंबई : जोधपुर न्यायालयाने बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान यांच्यावर काळवीट शिकार प्रकरणाबाबत शिक्षा सुनावली होती. सीजीएम देव कुमार खत्री यांनी 5 एप्रिल रोजी या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र 2 दिवसानंतर सलमानला या प्रकरणात जामीन मंजूर झाली. मात्र सलमान खान 2 रात्र जोधपुर मध्यवर्ती कारागृहात राहिला आणि त्याला ''कैदी नंबर 106'' या नावाने ओळखण्यात आलं.
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान जेलमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या इतर कैद्यांना भेटायला येणाऱ्या कुटुंबियांना मात्र भरपूर त्रास झालेला आहे. जोधपुर कारागृहात असलेल्या आपल्या नवऱ्याला 7 एप्रिलला भेटायला आलेल्या पत्नीला भेटता आलं नाही. यामुळे या पत्नीने सलमान खानवर आरोप लावले आहेत की, असं पहिल्यांदा तिला आपल्या नवऱ्याला भेटता आलं नाही.
ही महिला आपल्या नवऱ्याला भेटायला गेली असता त्याच दिवशी सलमान खानला जामीन मिळणार होती. सलमान खानला 50 हजार रुपये जामीन राशी आणि 25 - 25 हजार रुपये देखील जामीनासाठी भरावे लागले. तसेच जामीन देताना कोर्टाने सांगितले की, कोणतीही परवानगी न घेता सलमान खान देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. हे पण वाचा - सलमान खान चाहत्यांंसमोर आल्यानंतर 'तीन बोटं' का दाखवतो ?
elatives of Jodhpur Central Jail prisoners say police isn't letting them meet their relatives inside jail. 'It's for the 1st time I'm unable to meet my husband',says a woman who'd come to meet her husband in jail. #SalmanKhan who was lodged in same jail would be released shortly pic.twitter.com/jlGhdgoEkT
— ANI (@ANI) April 7, 2018
सलमान खानवर जोधपुर न्यायालयाची करडी नजर
पुढच्या महिन्यात पुन्हा न्यायालया समोर यावं लागणार सलमानला 7 मे 2018 मध्ये सलमान खानला जामीन मिळाली आहे. आथा सलमान खान मुंबईत आहे. रेस 3 हा सलमान खानचा आगामी सिनेमा असून बॉबी देओल यामध्ये दिसणार आहे.