Bedroom Secrets: करण-तेजस्वी यांचे बेडरूम सिक्रेट अखेर समोर

खुद्द करणने सांगितले त्याचे आणि तेजस्वीचे बेडरुम सिक्रेट, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Jun 18, 2022, 09:29 AM IST
Bedroom Secrets: करण-तेजस्वी यांचे  बेडरूम सिक्रेट अखेर समोर title=

मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अनेक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. खरंतर हे दोघेही एकमेकांना एका रिएलीटीशो दरम्यान भेटले. हा शो संपला तरी देखील हे दोघेही एकमेकांसोबत पाहिले गेले आहेत. तेजस्वी आणि करण यांनी एकमेकांवरील असलेलं प्रेम कधीही कोणापासून लपवून ठेवलेलं नाही. 

या जोडप्याला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे. हे जोडपं नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडलेले आहेत की, ते त्यांचे प्रेम कुठेही आणि कधीही व्यक्त करतात.

आता पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलं आहे, ते म्हणजे त्यांच्या बेडरुम सिक्रेटमुळे. रिऍलिटी शोमध्ये कंगना रानौतने करण आणि तेजस्वीला विचारले की, त्यांच्यामध्ये सर्वात चांगला किसर कोण आहे? त्यावर या जोडप्याने अगदी मोकळेपणाने उत्तर दिलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगनाच्या या प्रश्नाला उत्तर देताना करण कुंद्राने तेजस्वीचे नाव घेतलं आणि तिला गुड किसर असल्याचं सांगितलं. करणने दिलेल्या उत्तरानंतर तेजस्वी प्रचंड लाजली. 

संबंधित किस्सा कंगना रानौतने होस्ट केलेल्या OTT रिअऍलिटी शो 'लॉक अप'मधली आहे. जेव्हा करण आणि तेजस्वी शोमध्ये एकत्र दिसले होते. करण आणि तेजस्वीच्या चर्चा कायम रंगेलेल्या असतात. 

तेजस्वीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या  'नागीन' मलिकेत दिसत आहे. तेजस्वी लवकरचं बॉलिडूनमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता आयुष्मान खुरानासोबत तेजस्वी 'ड्रिम गर्ल 2' सिनेमात दिसणार आहे.