मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अक्षय कुमारने गेल्यावर्षी जवानांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 'वीर' नावाची एक वेबपोर्टल तयार केली आहे. या वेबपोर्टलच्या अंतर्गत अक्षय कुमारने आतापर्यंत 29 करोड रुपयांची राशी जमा केली आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत फॅन्सची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोत 'भारता के वीर' ला एक वर्ष पूर्ण झालं असून 29 करोड रुपये जमा झाली आहे. या वेब पोर्टलसोबत आतापर्यंत 159 कुटूंब जोडली गेलेली आहे.
Today @BharatKeVeer completes a year...a dream which is now a growing reality and it gives me immense happiness to share Rs. 29 crores has been raised till now which has supported 159 families of our bravehearts. Keep showing your gratitude https://t.co/5j0vxsSt7 pic.twitter.com/GgaLUjeBIc
— Akshay Kumar (@akshaykumar) April 9, 2018
अक्षय कुमारचे फॅन्स त्याच्या या कामात सपोर्ट करत आहेत. प्रत्येकजण अक्षय कुमारच्या या कामाचं भरभरून कौतुक करत आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत के वीर जवान नावाचं वेब पोर्टल लाँच केलं आहे अक्षय कुमारने देशातील जवानांच्या कुटुंबाकरता आर्थिक मदत मागितली आहे. आणि ही मदत या पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे.