सलमान - कतरिनाच्या 'भारत'चे पोस्टर व्हायरल

'देश की मिट्टी, मेरा देश. भारत को सलाम' 

Updated: Apr 18, 2019, 04:32 PM IST
सलमान - कतरिनाच्या 'भारत'चे पोस्टर व्हायरल

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'भारत' येत्या ईदला प्रदर्शित होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून चित्रपटाचं नवं पोस्टर लॉन्च करण्यात येत आहे. सलमानच्या ग्रे लुक आणि डिस्को अवतारानंतर आज पुन्हा एकदा एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान एका नेव्ही ऑफिसरच्या गेटअपमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये कतरिनाही दिसत आहे. या पोस्टरवर १९८५ हे सालही लिहिण्यात आलं आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि सलमान खानव्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानीही प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने 'भारत'चं पोस्टर पोस्ट करत 'देश की मिट्टी, मेरा देश. भारत को सलाम' असं लिहिलं आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटात देशभक्तीपर काही खास असल्याचा अंदाज लावला जात आहे.

या पोस्टरआधी सलमानने कॅटरिनासह आणखी एक पोस्टर रिलीज केलं होतं. ज्यात सलमानने 'फिर हमारी जिंदगी में आई मॅडम सर' असं म्हणत पोस्टर सोशल मिडियावर पोस्ट केलं होतं. 

'भारत' साऊथ कोरियन चित्रपट 'ओड टू माय फादर' चित्रपटाचा रिमेक आहे. 'ओड टू माय फादर' चित्रपटात १९५० पासून २०१४ पर्यंतची वर्ष एका सामान्य नागरिकाच्या नजरेतून मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली होती. 'भारत'मध्येही अशाच प्रकारे सलमान खानच्या भूमिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवला जाऊ शकतो.