मुंबई : मनोरंजन जगात अशी प्रकरण सारखी समोर येत असतात. ज्यात नवरा-बायकोचं भांडण समोर येतं. गेल्या दिवसांत टीव्ही इंडस्ट्रीतून असे अनेक प्रकरण समोर आली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा ताजं प्रकरण समोर येत आहे. आणि हे प्रकरण आहे भोजपुरी सिनेमा जगतातून भोजपूरी सिनेस्टार पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहने आपल्या पती विरोधात मोठा खुलासा केला आहे. तिने पवन सिंह विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. जे जाणून अभिनेत्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.
पवन सिंहवर आरोप
पवन सिंहच्या पत्नीने त्याच्या कुटुंबीयांवर आरोप केला आहे की, अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी गर्भधारणेदरम्यान अशी औषधे दिली, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. ज्योती म्हणाली की, पवन सिंग अनेकदा दारूच्या नशेत घरी यायचा आणि त्याच्यासोबत गैरवर्तन करायचा. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्योती ही पवन सिंहची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. अशा परिस्थितीत आता ज्योती सिंहच्या आरोपांनंतर आता हे लग्न जास्त काळ टिकणार नाही असं लोकांना वाटत आहे.
गर्भपात केल्याचा आरोप
पवन सिंगवर आरोप करताना ज्योती म्हणाली की, अभिनेत्याने तिच्यावर गर्भपातासाठी दबाव आणला आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. इतकंच नाही तर ज्योतीने पवन सिंगवर मानसिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्योतीने केवळ अभिनेता पवन सिंगवरच नाही तर त्याच्या आई बहिणीवरही गंभीर आरोप केले आहेत.
ज्योती म्हणाली की, 2018 मध्ये पवन सिंगसोबत लग्न केल्यानंतर पवन सिंगच्या आई आणि बहिणीने तिला लूकबद्दल टोमणे मारायला सुरुवात केली. पवन सिंगच्या आईनेही त्याच्या मामाकडून ५० लाख रुपये हडप केले. पवनसिंगची आई रोज ज्योतीला शिवीगाळ करायची.