'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय भोजपूरी अभिनेत्री Rani Chatterjee; म्हणाली, 'माझ्या जागी कोणी असतं तर...'

राणीने तिच्या ऑफिशिअल फेसबुक वॉलवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली.

Updated: Dec 4, 2021, 06:43 PM IST
'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय भोजपूरी अभिनेत्री Rani Chatterjee; म्हणाली, 'माझ्या जागी कोणी असतं तर...'

मुंबई : भोजपुरी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री राणी चॅटर्जी इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्षे मेहनत आणि सौंदर्यामुळे तिने चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक चित्रपटात ती वेगळ्याच अंदाजात दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या एका कृतीने चाहत्यांना घायाळ करणारी राणी चॅटर्जी बऱ्याच दिवसांपासून एका आजाराशी झुंज देत आहे. तिने स्वत: तिच्या या आजाराबद्दल सोशल मीडियावरती माहिती दिली. खरंतर राणी चॅटर्जीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

राणीने तिच्या ऑफिशिअल फेसबुक वॉलवर एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, ती गेल्या दोन वर्षांपासून एका आजाराशी झुंज देत आहे.

या पोस्टमध्ये तिने ज्याप्रकारे आपल्या या आजाराबद्दल सांगितले, ते वाचून तिचे चाहते दु:खी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ती अॅलर्जीसारख्या आजाराशी झुंज देत असल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.

या पोस्टमध्ये राणीने तिच्या वेदना सांगण्यासोबतच अशा लोकांवरही निशाणा साधला आहे, जे तिच्या आजूबाजूला राहूनही तिच्या या आजाराबद्दल माहित असूनही तिला जज करतात. राणीने त्या सगळ्या लोकांना चांगलेच उत्तर दिले, जे लोकं मुलींना त्यांच्या शरीराची बनावट आणि रंगानुसार विनाकारण जज करतात. तिने सांगितले आहे की, ती तिच्या या आजाराचा सामना करणे किती कठीण आहे.

पोस्टमध्ये काय लिहिले आहे

या लांबलचक पोस्टमध्ये राणीने लिहिले आहे की, "गेल्या दोन वर्षांपासून मला ऍलर्जी आहे, पण ही गोष्ट मी कधीही कोणाशी शेअर केलेली नाही. आज मी तुम्हा सर्वांना सांगत आहे कारण लोक खूप जजमेंटल झाले आहेत. लोक, आम्हा अभिनेत्रींना परफेक्ट पोशाखात बघायचे असचे. जेव्हा मेकअप करत नाही तेव्हा देखील लोक जज करतात. जेव्हा आम्ही मेकअप करतो तेव्हा देखील लोक जज करतात. मला हे सांगायचे आहे की, मी कोणाला दाखवण्यासाठी काहीही करत नाही. माझ्या आयुष्यातील एकही दिवस कोणीही जगू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जज करू नका. हस खेळत आपल्या जिवनातील दु:ख विसरणे सोपं नाही."