मुनमुन दत्तासोबत डेटवर कधीच जाणार नाही जेठालाल, कारण..

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ 

Updated: Dec 4, 2021, 04:51 PM IST
 मुनमुन दत्तासोबत डेटवर कधीच जाणार नाही जेठालाल, कारण.. title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील सर्वात प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चष्मा जवळपास 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे,  त्यातील प्रत्येक पात्राबद्दल सर्वांना माहिती आहे. सर्वांनी घराघरात आपली छाप पाडली आहे.

गेल्या काही महिन्यांत या शोची काही पात्रे बदलली आहेत, पण आजही अशी अनेक पात्रे आहेत जी वर्षानुवर्षे या शोचा भाग आहेत आणि यातील मुख्य पात्र म्हणजे दिलीप जोशी हे आहेत. गेल्या 13 वर्षांपासून जेठालाल बनून ते लोकांचे मनोरंजन करत आहे.

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक रिपोर्टर दिलीप जोशींना विचारतो की, जर मला मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी यांना डेटवर घेऊन जायचे असेल तर ते कुठे घेऊन जातील?

बबिता जी आणि जेठालाचे पात्र लोकांना खूप आवडतात आणि चाहत्यांना पॉइंट आणि गंमत या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. अशा परिस्थितीत दिलीप जोशी यांना त्यांची आवडती स्टार मुनमुन दत्ताला कुठे घेऊन जायचे आहे याबद्दल त्यांनी उत्तर दिलं आहे. 

जेठालाल बबिताजींना कुठे घेऊन जाणार?

दिलीप जोशी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो एका फॅन पेजने शेअर केला आहे आणि त्यात एका रिपोर्टरने प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांना विचारले की, तुम्ही 'बबिता जी' ला जेठालाल डेटवर कुठे घेऊन जातील?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप जोशी म्हणाले की, 'मी जेठालालचं माहित नाही, पण मला दिलीप जोशी म्हणून डेटवर जायचे नाही. मी एक विवाहित व्यक्ती आहे आणि खूप आनंदी विवाहित व्यक्ती आहे त्यामुळे मला डेटवर जाण्याची गरज नाही.