Amitabh Bachchan New House : 5 बंगले, 1 डुप्लेक्सनंतर बिग बी यांनी खरेदी केलं आलिशान घर

Amitabh Bachchan Property : आधीपासूनच 5 बंगले आणि 1 डुप्लेक्सचे मालक असलेले अमिताभ यांनी मुंबईत आणखी एक आलिशान घर (Amitabh Bachchan New House) विकत घेतलंय.

Updated: Sep 21, 2022, 11:41 PM IST
Amitabh Bachchan New House : 5 बंगले, 1 डुप्लेक्सनंतर बिग बी यांनी खरेदी केलं आलिशान घर
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : 'महानायक'  अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan) 79 वर्षांचे आहेत. हे वय निवृत्तीचं आरामात आयुष्य घालवण्याचं असतं. मात्र अमिताभ बच्चन मात्र करिअरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मनमोकळेपणाने आनंद घेत आहेत. 'बिग बी' भरपूर पैसे कमवून तेवढीच गुंतवणूक करतात. आता अमिताभ यांनी मुंबईत घर घेतल्याचं समजतंय. आधीपासूनच 5 बंगले आणि 1 डुप्लेक्सचे मालक असलेले अमिताभ यांनी मुंबईत आणखी एक आलिशान घर (Amitabh Bachchan New House) विकत घेतलंय. जे अतिशय उच्चभ्रू परिसरात आहे. हे घर 31व्या मजल्यावर असल्याची माहिती आहे. तसेच या घरातून मुंबईचं सुंदर रुप पहायला मिळतं. (big b amitabh bacchan bought new property in mumbai know detalis and see photo)

अमिताभ यांनी खरेदी केलेल्या घराच्या किंमतीबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. 12 हजार चौरस फुटांची ही मालमत्ता असल्याचे बोललं जात आहे. पार्थेनॉन सोसायटीत 31 व्या मजल्यावर आहे. अमिताभ यांनी संपूर्ण मजला विकत घेतला आहे. पण बिग बी आता कुटुंबासोबत तिथे शिफ्ट होणार नाहीत. तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे अपार्टमेंट विकत घेतले आहे. अमिताब यांनी गेल्या वर्षी देखील 31 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली होती ज्याची खूप चर्चा झाली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

5 बंगल्याचे मालक

अमिताभ आधीच 5 बंगल्यांचे मालक आहेत. त्यांचा 'जलसा' हा 10 हजार स्क्वेअर फुटांचा बंगला आहे. या ठिकाणी अमिताभ पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्यासोबत राहतात. दुसरा बंगला 'प्रतीक्षा', जिथे अमिताभ आई-वडिलांसोबत राहत होते. पण सध्या तिथे अधूनमधून भेट देत असतात. तिसरा बंगला 'जनक', जिथून अमिताभ बच्चन यांचे ऑफिस चालते. चौथा बंगला 'वत्स' आणि पाचवा बंगला जलसाच्या मागे आहे.