बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Updated: Dec 29, 2019, 05:31 PM IST
बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान  title=

मुंबई : रविवारी (२९ डिसेंबर २०१९) संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार २३ डिसेंबर रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात प्रदान करण्यात येणार होता. परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थिर राहू शकले नव्हते. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

२३ डिसेंबर रोजी पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहता न आल्याची खंत खुद्द बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. 'मला ताप आल्यामुळे मी राष्ट्रीय पुरस्कार सोहळयात उपस्थित राहू शकलो नाही. शिवाय डॉक्टरांनी प्रवास करायला नकार दिला आहे.' त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अमिताभ यांना दादा साहेब फाळके हा पुरस्कार २९ डिसेंबर रोजी देण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. अखेर त्यांना आज 'दादासाहेब फाळके' पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

यावेळी 'नाळ' या चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीनिवाससह इतर तीन बालकलाकारांचाही गौरव करण्यात आला.