मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बचन आणि आयुषमान खुराना यांचा 'गुलाबो-सिताबो' हा सिनेमा येत्या १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मॉल्स आणि थिएटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवरून रिलीज करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती शेअर केली आहे.
T 3531 - Ek izzatdaar janaab aur uske anokhe kirayedar ki kahaani ..
Gulabo Sitabo premieres June 12 only on @PrimeVideoIN! #GiboSiboOnPrime #WorldPremiereOnPrime@ayushmannk @ShoojitSircar @ronnielahiri #SheelKumar #JuhiChaturvedi @filmsrisingsun @Kinoworksllp pic.twitter.com/DQo4Xy3g2q
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 14, 2020
अमिताभ बच्चन यांनी दोन ट्विट शेअर केलेत. यातील एका ट्विटमध्ये त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.
T 3531 -Joined Film Ind., in 1969 .. in 2020 .. its 51 years !! .. seen many changes and challenges .. NOW another CHALLENGE ..
DIGITAL RELEASE of my film GULABO SITABO !!
June 12 Amazon Prime 200+ country's .. THAT IS AMAZING !
Honoured to be a part of yet another change pic.twitter.com/ccH2Qxh92D— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 14, 2020
यामध्ये अमिताभ बच्चन सांगतात की, मी १९६९ साली सिनेसृष्टी जॉईन केली. २०२० पर्यंत मला या सिनेसृष्टीत ५१ वर्षे झाली आहे. एवढ्या वर्षात अनेक बदल आणि आव्हान देखील पाहिलं. आता हे नवं चॅलेंज... डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'गुलाबो सिताबो' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. १२ जून रोजी ऍमेझॉन प्राईमवर हा सिनेमा एकाचवेळी २०० हून अधिक देशात प्रदर्शित होणार आहे. या नवीन बदलाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे.