नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये सुंदर अभिनेत्रींची काही कमी नाही. मात्र सर्वचजणींच बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवू शकल्या नाहीत. १-२ चित्रपटांनंतर त्या चित्रपटसृष्टीतून गायबच झाल्या.
आयशा टाकियाने 'टारजन द वंडर कार' मधून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती.
'कहो न प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री १-२ चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये झळकली नाही.
२००१ मध्ये मिस फेमिना इंडिया जिंकलेल्यानंतर सेलिना जेटलीसाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. मात्र त्यानंतर तिथे सातत्याने आपला जलवा टिकवण्यात तिला यश आले नाही.
सुप्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्री धर्मेंद्र और हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल. हीने 'कोई मेरे दिल से पूछे' (2002) चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली. तिचे चांगली प्रशंसा देखील झाली. मात्र हळूहळू ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली.
जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील क्युट कपल आहे. मात्र जेनेलियाला अभिनेत्री म्हणून फारसे यश मिळाले नाही.
अभिनेत्री मिनीषा लांबा हीने २००५ मध्ये यहां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरूवात केली.
काही चित्रपटात काम करूनही रिया सेन आपली खास ओळख निर्माण करू शकली नाही.
कमल हसनची मुलगी आणि अभिनेत्री श्रृती हसनने बॉलिवूडमध्ये लक या चित्रपटातून पर्दापण केले. मात्र तिचे स्थान प्रस्थापित करण्यासीठी ती अजूनही झगडत आहे.
२००४ मध्ये 'दिल मांगे मोर' मधून आपल्या करियरची सुरूवात केलेल्या सोहाने 'रंग दे बसंती', बंगाली फिल्म 'रंग दे महल' मध्ये काम केले. मात्र तिला फारसे यश लाभले नाही.
विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलेली ही अभिनेत्री अजूनही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी झटत आहे.