नवी दिल्ली: सोशल मीडियावर असणाऱ्यांना ढिंचॅक पूजाची ओळख काही नवी नाही. सेल्फी मै ने लेली यार या गाण्याने ती चर्चेत आलेली ढिंचॅक पूजा वादग्रस्त बिग बॉसमध्ये एन्ट्री करत आहे. आज रात्री टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये ढिंचॅक पूजा ही मॉडेल, स्पिट्सविलात कंटेस्टंट असलेल्या प्रिंयाक शर्मासोबत सहभागी होत आहे. पण याआधीच तिचे नवे गाणे 'आफरीन फातिमा बेवफा है' हे गाणे रिलीज झाले आहे. तिच्या गाण्याचे टायटल 'सोनम गुप्ता बेवफा है' पासून प्रेरित असल्याचे दिसते.
शुक्रवारी रात्री तिचे नवे गाणे 'आफरीन फातिमा बेवाफा है ...' रिलीज करण्यात आले आहे.
अवघ्या १३ तासात ६० हजार पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. गाण्याच्या नावाप्रमाणे त्यातील शब्दही विचित्र असेच आहेत. या २ मिनिटांच्या गाण्यात ढिंचॅक पूजा ही फातिमाच्या बेवफाई च्या स्टोरी सांगत आहे. याआधीच्या गाण्यांप्रमाणेच ढिंचॅक पूजा चा 'मधूर' आवाज तुमच्या कानाला टोचू शकतो.
"बिग बॉसकडून मला पहिला कॉल आला तेव्हा मी माझ्या नव्या गाण्यात बिझी होते म्हणून मी त्यावेळेस नकार दिला होता. पण आता माझा गाणे तयार झाले आहे. त्यांनी पुन्हा मला विचारले त्यामूळे मी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे' ढिंचॅक पूजाने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
माझ्या बिझी श्येड्यूलमुळे मी हा सिझन आतापर्यंत पाहिला नाही पण जेवढ काही पाहिलय ते खूप एन्जोय केलय असेही तिने सांगितले.