close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Bigg Boss 12 : घराचा इनसाइड व्हिडिओ Leak

असं दिसत बिग बॉस 12 चं घर 

Bigg Boss 12 : घराचा इनसाइड व्हिडिओ Leak

मुंबई : टेलिव्हीजनचा सर्वात विवादित आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Bigg Boss 12 दोन दिवसांत सुरू होणार आहे. शोच्या मेकर्सने आतापर्यंत घरात येणाऱ्या जोड्यांची नावे गुपित ठेवली आहेत. यामुळेच सलमान खानच्या या शो ची खूप चर्चा होते. मेकर्सने कितीही लपवलं तरी या शोच्या घरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत घरातील अनेक भाग दाखवण्यात आले आहेत. 

बिग बॉसचा 12 वा सिझन 16 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. या शोमध्ये यंदा आपल्याला जोड्यांच्या रुपात स्पर्धक दिसणार आहे. यामध्ये भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया देखील दिसणार आहे. तसेच टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड देखील या शोचा भाग आहे.