'यार, कसम खुदा की, मैं अपनी...', मृत्यूच्या धमक्या येत असतानाच सलमानचा 'Bigg Boss' मधील Video Viral

Salman Khan Cryptic Comment: सलमान खानने 'विकेंड का वार'दरम्यान आपला संताप व्यक्त करताना नोंदवलेली प्रतिक्रिया त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींशी संबंधित आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 21, 2024, 08:18 AM IST
'यार, कसम खुदा की, मैं अपनी...', मृत्यूच्या धमक्या येत असतानाच सलमानचा 'Bigg Boss' मधील Video Viral title=
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Salman Khan Cryptic Comment: अभिनेता सलमान खान बिग बॉसच्या 18 व्या पर्वाच्या शुटींगसाठी पुन्हा सेटवर परतला आहे. सलमान खानचा जीवलग मित्र आणि राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांनी 12 ऑक्टोबर रोजी हत्या केल्यानंतर सलमान पहिल्यांदाच बिग बॉसच्या सेटवर आला. विकेंड का वारच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान हा या शोच्या शुटींगसाठी येण्यास फारसा उत्सुक नव्हता हे दिसून येत आहे. बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर सलमानलाही जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्याच्या बातम्या आहेत. असं असतानाच आता बिग बॉस कार्यक्रमातील एक क्लिप कार्यक्रमाचा 'विकेंड का वार'चा भाग प्रदर्शित होण्याआधीच सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली असून यामध्ये सलमानने सूचक पद्धतीने बाबा सिद्धीकींच्या हत्येनंतरच्या आपल्या मनस्थितीवर भाष्य केलं आहे.

शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रामधील वाद सोडवण्याची वेळ

बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील वाद सोडवण्याची वेळ सलमानवर आल्याने तो चिडलेला दिसला. आपल्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत असून असा याच्यात मी हे सारं पाहू का असा सवाल सलमानने स्पर्धकांना विचारला. आपण दिलेल्या शब्दाखातर आपण काम करत असल्याचं सलमानने सांगितलं. खरं तर कोणाला भेटण्याचीही आपली इच्छा नसल्याचं सलमान म्हणाला. शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रा यांच्यात झालेल्या वादानंतर शिल्पाने जेवण सोडलं. शिल्पा हे सांगताना रडू लागली. यावरुन सलमानने तुमची मुलगी जेवणावर राग काढू लागली तर तुम्ही काय कराणार? असं विचारलं. त्यावर शिल्पाने आपला राग हा अन्नावर नसून अविनाशवर असल्याचं सांगितलं. 

मी आज इथे नको यायला हवं होतं

शिल्पाला सल्ला देताना, "या घरात तुम्ही भावनांबरोबर कोणतं नातं ठेवता कामा नये," असं सलमान म्हणाला. होस्ट म्हणून बोलताना सलमानने, "आज मला असं वाटतं असे की आज मी इथे असायला नको होतं. मला इथे यायचं नव्हतं. पण काही शब्द दिल्याने मी इथं आलो आहे. हे माझं काम आहे. मी इथं काम करायला आलो आहे. मला खरं तर कोणालाच भेटायचं नव्हतं. मला तुम्हालाही भेटायचं नव्हतं. मी आज इथं नको यायला हवं होतं असं मला वाटतंय. मात्र दिलेल्या शब्दासाठी मी आलोय," असं स्पर्धकांना सांगितलं.

कसम खुदा की...

त्यानंतर सलमान आफरीन खानवर संतापला. इतरांचं म्हणणं ऐकून घेणं का महत्त्वाचं असतं हे सलमान तिला समजावून सांगत होता. मात्र वारंवार आफरीन सलमानच्या बोलण्यात अडथळा आणत होती. तिचं हे असं हटकणं सहन न झाल्याने सलमानने, "यार, कसम खुदा की, मैं अपनी जिंदगी में इन सब से गुजर रहा हूं और मुझे इससे निपटना होगा।" असं म्हणत संताप व्यक्त केला. आपल्या खासगी आयुष्यात एवढ्या साऱ्या गोष्टी घडत असताना इथे येऊन मला हे सारं म्हणजेच तुमच्यांमधील भांडणं सोडवावी लागत आहे, असं म्हणत सलमानने नाराजी व्यक्त केली.

सलमानने यावेळेस त्याच्यावर आरोप लावण्यात आल्याने आई-वडिलांना काय सहन करावं लागतं याची कल्पना असल्याचंही म्हटलं.