Bigg Boss OTT : शिल्पा शेट्टीने शमिताला पाठवला खास मॅसेज, बहिणीला आलं गहिवरून

Raj Kundra प्रकरणानंतर शमिताही अडकली संकटात 

Updated: Aug 23, 2021, 11:26 AM IST
Bigg Boss OTT : शिल्पा शेट्टीने शमिताला पाठवला खास मॅसेज, बहिणीला आलं गहिवरून

मुंबई : शमिता शेट्टी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण सध्या बिग बॉस (Bigg Boss OTT) वर आपली जादू कायम ठेवत आहे. राज कुंद्रा कोठडीत असतानाच शमिता शेट्टीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यामुळे ती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली. या परिस्थितीत शमिकाची एन्ट्री झाल्यामुळे सगळेच हैराण झाले. आता हल्लीच शमिताची बहिण म्हणजे शिल्पा शेट्टीने तिला खास मॅसेज पाठवला आहे.

या अडचणीच्या काळात बिग बॉसमध्ये एन्ट्री केल्यानंतर शमिताने स्पष्टीकरण दिलं होतं. राज कुंद्राच्या अटकेआधीच तिने हा शब्द दिला होता. शमिता शोमध्ये कुटुंबाबद्दल बोलताना अतिशय भावूक झाली. अशातच रक्षाबंधनच्या वेळी शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ पाहून ती आणखी भावूक झाली.  

भावूक झाली शमिता 

रक्षाबंधनच्या दिवशी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये चाहत्यांना खास तडखा पाहायला मिळाला आहे. शोमध्ये रविवारी हिना खान दिसली. तसेच काही स्पर्धकांची त्यांची भावंडाशी भेट घडवून आणली. हिनाकडून अनेक व्हिडिओ मिळाल्यामुळे अनेक स्पर्धक भावूक झाले. शमिता शेट्टी आपल्या बहिणीचा शिल्पाचा खास मॅसेज पाहून देखील भावूक झाली. 

बहिणीला माहिती देताना शिल्पा म्हणते की, तू खूप चांगली खेळत आहेस. अजून चांगल खेळायला हवं तसेच आपली भूमिका देखील सोडायला हवी. शिल्पा पुढे शमिताला आपल्या आईच्या प्रकृतीबद्दल सांगते. सगळं व्यवस्थित आहे. हा व्हिडीओ बघून शमिता शेट्टी भावूक झाली आहे. 

राज कुंद्राच्या अटकेनंतर गायब झालेली शिल्पा शेट्टी पुन्हा ऍक्टीव, छोट्या पडद्यावर दिली महत्वाची माहिती या व्हिडीओत शमिता देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. इंडस्ट्रीत माझा प्रवास खूप खडतर राहिला आहे. पण मला आता जास्त आत्मविश्वास आहे. आजही मला शिल्पाची बहिण म्हणून ओळखलं जातं. ही एक सावली आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते. मला माझ्या नावाने नाही तर बहिणीच्या नावाने ओळखली जाते.