​शिल्पा शिंदेनं ट्विटरवर शेअर केला पॉर्न व्हिडिओ... हिना खानचा आक्षेप

मात्र शिल्पाचं हे ट्विट बिग बॉसमधलीच आणखी एक प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रंड रॉकी यांना काही पटलेलं दिसत नाहीय. 

Updated: Apr 24, 2018, 08:00 PM IST
​शिल्पा शिंदेनं ट्विटरवर शेअर केला पॉर्न व्हिडिओ... हिना खानचा आक्षेप title=

मुंबई  : 'बिग बॉस' विजेती शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आहे... ती एका व्हिडिओमुळे... शिल्पानं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं 'कृपया हा व्हिडिओ पाहा, तुम्हाला कळेलच की ज्यांना काही काम धंदा नाही ते लोक इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. शिल्पा शिंदेचा एमएमएस लीक झाल्याचं सांगत जो व्हिडिओ शेअर केला जातोय त्या खऱ्या मुलीचा हा व्हिडिओ'...

एका अश्लील व्हिडिओत शिल्पा शिंदे आणि बिग बॉसमध्ये तिच्यासोबत दिसलेला विकास गुप्ता यांचा हा व्हिडिओ असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. त्यावर शिल्पानं हे ट्विट केलं होतं... मात्र शिल्पाचं हे ट्विट बिग बॉसमधलीच आणखी एक प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रंड रॉकी यांना काही पटलेलं दिसत नाहीय. 

'दु:खद... एखादा फॅन किंवा ट्रोलर्सनं अशा कमेंट करून निघून जाणं एकवेळ समजू शकतं... पण एक पब्लिक फिगर असल्यानं आपल्याकडे लाखो लोकांसमोर पोहचण्याची शक्ती आहे... आपल्याला सतर्क असायला हवं. खरं आयुष्य कोणताही रिअॅलिटी शो नाही' असं ट्विट त्यावर हिना खान हिनं केलंय. 

तर हिनाचा बॉयफ्रेंड रॉकीनंही आपली नाराजी व्यक्त केलीय... 'तुम्ही कसं सांगू शकता की या व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसतेय ती हे जाणते की हा व्हिडिओ पॉर्न साईटवर जाणार आहे. हा बेजबाबदारपणा आहे... तुम्ही या घटनेत स्वत:ला पीडिता म्हणवता, परंतु तुम्ही असं करायला नको होतं. फॅन्स काय म्हणतात आणि काय नाही यामुळे काही फरक पडत नाही परंतु हे चुकीचं आहे'