दुधवाल्याचा हा मुलगा ठरला सुपर डान्सरचा विजेता...

गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय ठरलेला सुपर डान्सर चप्टर 2 या शो चा अंतिम सोहळा रविवारी पार पडला.

Updated: Mar 25, 2018, 11:55 AM IST
दुधवाल्याचा हा मुलगा ठरला सुपर डान्सरचा विजेता... title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय ठरलेला सुपर डान्सर चप्टर 2 या शो चा अंतिम सोहळा रविवारी पार पडला. या शो मध्ये बिशाल शर्मा विजयी ठरला. सुपर डान्सरचा किताब त्याने आपल्या नावे केला.

हे मिळाले बक्षीस

फिनालेमध्ये रितिक दिवाकर, वैष्णवी प्रजापति आणि आकाश थापा या स्पर्धकांनी त्याला चांगलीच टक्कर दिली. मात्र सर्वांना मागे टाकत बिशालने प्रेक्षकांची पसंती मिळवली आणि शो चा विजेता झाला.
बिशालने सुपर डान्सरच्या ट्रॉफीसह 15 लाखांचे बक्षीसही पटकावले. शो च्या फिनालेमध्ये अभिनेता वरुण धवनही उपस्थित होता.

धमाल मस्तीने आणली कार्यक्रमाला रंगत

प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या आपल्या अक्टूबर सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो तेथे पोहचला होता. यावेळेस शो च्या जजेसने खूप मस्ती केली आणि स्पर्धकांनीही चांगली धमाल उडवून दिली.
वरुणचा अक्टुबर हा सिनेमा 13 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

असा शिकला बिशाल डान्स

बिशाल असामच्या एका दुधवाल्याचा मुलगा आहे आणि आसाममध्ये राहून तो डान्स शिकला आहे. तो गोठ्यात डान्स शिकला असून त्याच्या कुटुंबियांच्या पाठींब्यामुळे तो इथंपर्यंत पोहचला असल्याचे त्याने सांगितले. आपल्या यशामुळे तो भलताच आनंदीत आहे.