आमीर खानने इंस्टाग्रामवरील 'ही' पोस्ट केली डिलीट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या ५३व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अॅपवर अकाऊंट सुरू करून चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.

Dakshata Thasale Updated: Mar 25, 2018, 10:59 AM IST
आमीर खानने इंस्टाग्रामवरील 'ही' पोस्ट केली डिलीट

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या ५३व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अॅपवर अकाऊंट सुरू करून चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.

त्यानं आपल्या पहिल्यावहिल्या पोस्टमधून आई जीनत हुसैन यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने मुलासोबतचा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे, आमिरने दुसरा फोटो शेअर करण्यापूर्वी त्यानं पोस्ट केलेला पहिला फोटो म्हणजेच त्याच्या आईचा फोटो डिलीट केलाय. 

 

My two babies... gifting me my birthday card :-)

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

आमिर खान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी इंस्टाग्रामवर एन्ट्री केली. आमिर खानने आज त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंस्टाग्रामवर एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी त्याच्या अकाऊंटवर 2.4 लाख पेक्षा अधिक फॉलोवर्सनी त्याला फॉलो केलं आहे. तसेच आमीर खानचे अकाऊंटही व्हेरिफाईड झाले आहे. 

आमीर खानने इंस्टाग्रामवर शेअर केलेला पहिला फोटो हा त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीचा आहे. ती व्यक्ती म्हणजे आमीर खानची आई आहे. इंस्टाग्रामवर कोलाज स्वरूपात आमीरने आईचा फोटो शेअर  केला आहे.