बोल्ड Nora Fatehi चा बंगाली लूक; चाहते म्हणाले, 'अशी अपेक्षाही नव्हती...'

सोशल मीडियावर सतत तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओची चर्चा असते. 

Updated: Jul 28, 2021, 09:07 AM IST
बोल्ड Nora Fatehi चा बंगाली लूक; चाहते म्हणाले, 'अशी अपेक्षाही नव्हती...' title=

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर सतत तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओची चर्चा असते. तिना अनेकदा वेग-वेगळ्या ड्रेसमध्ये पाहिलं जातं. पण आता नोराने बंगाली साडी नेसली आहे. शिवाय बंगाली लूकमध्ये नोरा अत्यंत सुंदर देखील दिसत आहे. त्यामुळे नोरा कोणत्याही स्टाईलमध्ये सुंदर, बोल्ड, हॉट दिसते असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर व्हारयल होत असलेल्या फोटोमध्ये नोराने पांढऱ्या रंगाची बंगाली साडी नेसली आहे. साडीवर गोल्ड आणि लाल रंगाची किनार आहे. चाहत्यांना देखील नोराचा  बंगाली लूक फार आवडला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र नोराच्या नव्या आणि बंगाली लूकची चर्चा आहे. 

नोरा बंगाली लूक एका इव्हेन्टसाठी कॅरी केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. नोराचे बंगाली साडीताल फोटो सेलिब्रिटी जर्नलिस्ट विरल भायानीने शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेन्टचा पाऊस पडला आहे. एका चाहत्याने कमेन्टमध्ये 'अशी अपेक्षाही नव्हती...' असं लिहिलं आहे.