आमिर खानची या खास व्यक्तीसोबत डिनर डेट

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान त्याच्या खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो.

Updated: Sep 17, 2021, 04:57 PM IST
 आमिर खानची या खास व्यक्तीसोबत डिनर डेट

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून नावाजलेला अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे किंवा समाज कार्यामुळे नाही तर खाजगी आयुष्यामुळे कायम तुफान चर्चेत असतो. तर दुसरं कारण म्हणजे त्याची मुलगी आयरा खान. आयरा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. शिवाय ती सतत तिच्या बॉयफ्रेन्डसोबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

आमिर खान अलीकडेच रात्री उशिरा डिनरनंतर मुंबईत त्याची मुलगी इरा खानसोबत स्पॉट झाला. या दरम्यान,  बऱ्याच दिवसानंतर आमिर खान मुलगी इरासोबत वेळ घालवताना दिसत आहे. मुख्य म्हणजे आजकालच्या धावत्या जगात अनेक पालकांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवता येत नाही. पण ईथे हे चित्र जरा वेगळं आहे आपल्या बिझी कामातून वेळात वेळ काढून आमिर आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना अनेकदा दिसतो. 

डिनर करुन आमिर आणि इरा बाहेर येताच, लोक त्यांना पाहण्यासाठी तिथे जमले. अशा परिस्थितीत, या काळात आमिर खान आपल्या मुलीचं संरक्षण करताना दिसला. समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, या काळात कोरोनामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होते. काही दिवसांपूर्वी आमिर खानने आपली दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट दिला. यासोबतच इरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे.