सलमानकडून चाहत्यांना गुडन्यूज, शाहरुखसाठी पोस्ट शेअर करत सांगितली खास गोष्ट

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.

Updated: Sep 17, 2021, 04:17 PM IST
सलमानकडून चाहत्यांना गुडन्यूज, शाहरुखसाठी पोस्ट शेअर करत सांगितली खास गोष्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. ज्यामध्ये शाहरुख खान असं बोलताना दिसत आहे की, लवकरच तो ओटीटीवर डेब्यू करणार आहे. या गोष्टीला आता बॉलीवूडचा दबंग सलमान खान आता शाहरुखला सपोर्ट करताना दिसत आहे. सलमानने शाहरुचा एक व्हिडिओ शेअर करत एक खास गोष्ट देखील लिहीली आहे.

सलमानने शेअर केला शाहरुखचा व्हिडिओ
सलमानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शाहरुखचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शनमध्ये सलमानने लिहिलं आहे की, स्वागत नहीं करोगे शाहरुख खान का? सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओला चाहते पसंती दर्शवत आहेत. आणि लाईक्स कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत. यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाहरुख लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारवर आपली एक फिल्म रिलीज करणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिनेमात दिसणार शाहरुख
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो पठाण सिनेमात दिसणार आहे. ही एक एक्शन ड्रामा फिल्म आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. सिनेमात शाहरुख खान के साथ दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम आणि डिंपल कपाड़िया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.